घरकुल योजना पार पडताना
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत
ग्रामपंचायत पळसा ता.हदगाव जि.नांदेड मंजुर लाभार्थी
येथे आज दि.03-02-2026 रोजी मंजुर लाभार्थ्यांना मार्कआऊट देण्यात आले…यावेळी हदगाव पंचायत समिती चे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आडेराघो साहेब ग्रामविकास अधिकारी कदम साहेब उपस्थित सरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता..
एक दिवस गावासाठी ग्राम दरबार
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पळसा येथे एक दिवस गावासाठी ग्राम दरबार आयोजित करण्यात आला व या सभेमध्ये ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आडे राघो साहेब, विस्तारी अधिकारी(पं ), आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहा. Krushi अधिकारी, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते
२६ जानेवारी आंतर्गत भरलेली सभा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पळसा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला व ग्रामसभा घेण्यात आली… ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विषयी सविस्तर माहिती देण्यात आली